Rashmi Mane
आज भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर, तिने दररोज देशाला या मोहिमेबद्दल माहिती दिलीच नाही तर लाखो महिलांना प्रेरणाही दिली.
सोफिया कुरेशीचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो?
सोफिया कुरेशीचा जन्म 12 डिसेंबर 1974 ला गुजरातमधील वडोदरा शहरात झाला. तिने बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास केला आणि त्यानंतर 1994 मध्ये ती सैन्यात भरती झाली.
परदेशी सैनिकांसोबतच्या मोठ्या लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. याशिवाय त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्येही भाग घेतला आहे.
कर्नल कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे कर्नाटकमधील गोकाक तालुक्यातील कोन्नूर शहरातील आहेत. ते सध्या भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत आहे.
लष्करी प्रशिक्षणादरम्यान सोफिया यांची भेट ताजुद्दीन यांच्याशी झाली. त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर 2015 मध्ये लग्न केले.