Roshan More
'रे-नगर' गृहनिर्माण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना नमन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली.
गेल्या नऊ वर्षात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ते २५ कोटी लोक आता माझे साथीदार आहेत, असे मोदी म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर नेण्याचा संकल्प मोदींनी बोलून दाखविला.
आपल्याला लहानपणी राहायला असे घर मिळालं असते तर..,असे म्हणत नरेंद्र मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
एकाच रेशनकार्डवर देशात कुठल्याही राज्यात मोफत रेशन मिळणार असल्याच्या योजनेची माहिती मोदींनी आपल्या भाषणात दिली.
'नरेंद्र मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी', असे म्हणत मोदींनी बँकांनी आपल्या गॅरंटीवर गरिबांना कर्ज दिले, असे सांगितले.
गरीबांना मिळणारे अनुदान मध्यस्थी खात होते. मात्र, हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे, असे मोदींनी ठणकावून सांगितले.
NEXT : रोहित पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद; फोटो व्हायरल...