Sqn Ldr Varlin Panwar : आर्मी ऑफिसरची लेक झाली एअरफोर्सची स्क्वाड्रन लीडर, आता बॉलिवूड स्टार्सची ट्रेनर!

Rashmi Mane

आर्मी संस्कारांत वाढलेली मुलगी

वर्लिन पंवार लहानपणापासून आर्मी वातावरणात वाढल्या. वडील सैन्यात असल्याने शिस्त, समर्पण आणि देशसेवेची भावना त्यांच्या मनात लहानपणीच रोवली गेली.

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

लहानपणापासून देशसेवेची प्रेरणा

प्रत्येक रविवार वडिलांसोबत धावायला जाताना, त्यांच्या अनुभवांनी वर्लिनच्या मनात सैन्यप्रती आकर्षण निर्माण केलं.

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

लहानपणीच ठरवलं सैन्यात जायचं

12 वर्षांचं वय असताना वर्लिन यांनी देहरादूनमध्ये 'पासिंग आउट परेड' पाहिली. त्याच दिवशी ठरवलं – "मलाही वर्दी घालायची आहे."

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

एनसीसी ते एअर फोर्स

शिक्षण घेताना त्यांनी एनसीसीमध्ये भाग घेतला. पावसात मार्च करणं, कॅम्पमध्ये राहणं आणि बेस्ट कॅडेटसाठी स्पर्धा – हाच खरा संघर्षाचा आरंभ होता.

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

10 वर्ष वायुसेनेत

वायुसेनेत 10 वर्ष सेवा दिल्यावर वर्लिन पंवार यांनी 2018 मध्ये निवृत्ती घेतली. पण त्यांच्या उडाण थांबली नाही – त्यांनी आयपीएल टेक्निकल सिक्युरिटी आणि सिनेमात सल्लागार म्हणून काम सुरू केलं.

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

सिनेमात भारतीय वायुसेना

'फाइटर', 'ऑपरेशन वेलेंटाइन' आणि 'स्काय फोर्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मिलिटरी अ‍ॅडव्हायझर म्हणून काम केलं. त्यांच्यामुळे सशस्त्र दलांचं वास्तव चित्रण शक्य झालं.

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

लाखों मुलींसाठी प्रेरणा

वर्लिन पंवार आज लाखों मुलींना सांगतायत – "स्वप्नं मोठी पाहा आणि त्यासाठी झगडा करा." त्यांच्या सारखं बनण्याचं स्वप्न बाळगणं हेच खरं प्रेरणादायी आहे!

Sqn Ldr Varlin Panwar Success Story | Sarkarnama

Next : भारतात पहिलं 'आधार कार्ड ' कोणाला मिळालं? 

येथे क्लिक करा