Deepak Kulkarni
रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंडमधील शेतकरी कुटुंबात झाला.
रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला.
रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून राजकारणाशी संबंध येऊ लागला.
2002 पासून पुढची 5-6 वर्षं त्यांनी महिला बचतगटासाठी काम केलं. 2007 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
त्यानंतर चाकणकरांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.
2019 ला राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.
प्रदेशाध्यक्षपदानंतर चाकणकर यांचं नाव राज्याच्या राजकारणात चर्चेत आलं.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, पुणे शहराध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्षपद असा प्रवास राहिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं.
आता चाकणकरांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.