सरकारनामा ब्यूरो
सफीन हसन गुजरातचे असून, वयाच्या 22व्या वर्षी आयपीएस झाले.
हसन यांनी इंजिनिअरिंगमधून शिक्षण घेतले आहे.
दहावी आणि बारावीमध्ये त्यांनी 92% गुण मिळवले आहेत.
शाळेत असताना हसन यांनी आयपीएस अधिकारी व्हायचं ठरवलं होतं.
2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 570वा रँक मिळवत 'यूपीएससी' परीक्षेत उत्तीर्ण झाले.
हसन यांना वाचनाची आवड असल्यामुळे यूपीएससीच्या तयारी दरम्यान त्यांना फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले.
आर्थिक परिस्थिती बिकट होती, हसन यांचे आई-वडील मजुरी करायचे. परंतु, आपल्या हुशारीच्या बळावर त्यांनी विविध शिष्यवृत्ती मिळवून यूपीएससीची तयारी केली.
या संपूर्ण प्रवासात हसनच्या आई-वडिलांनी त्यांना कायम पाठिंबा दिला.
हसन हे भारतातील सगळ्यात तरुण आयपीएस अधिकारी आहेत.