सरकारनामा ब्यूरो
IAS अमित काळे हे यूपीएससीच्या परीक्षेत तीनदा अपयशी झाले. परंतु चौथ्या प्रयत्नात हव्या त्या रँकसह ते अधिकारी झाले.
2014 पासून त्यांनी परीक्षा देण्यास सुरुवात केली होती. चारही प्रयत्नात प्राथमिक फेरी पार केली, पण पहिल्या दोन प्रयत्नांत ते अंतिम फेरी गाठू शकले नाहीत.
तीन अपयश पचवूनही त्यांनी अजिबात हार मानली नाही. ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतच राहिले.
शेवटच्या स्तरावर येऊन माघारी यावे लागत असल्याने चौथ्या प्रयत्नासाठी अभ्यास करताना त्यांनी अनोख्या रणनीतीचा अवलंब केला.
आपल्या क्षमतेनुसार विषय अवघड किंवा सोपे वाटू शकतात. अशा परिस्थितीत आधी हे ठरवून मग त्यानुसार तयारी करावी असे त्यांनी सांगितले.
'SWOT' विश्लेषणानुसार तयारी करून पुढे जावे. प्रत्येकजण वेगळा असल्याने कधीही इतरांची कॉपी करू नये असेही त्यांनी सुचवले.
तयारीच्या सुरुवातीला त्यांनी सर्वप्रथम सोप्या विषयाचा अभ्यास करून मग कठीण पेपरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.
'अपयशाला घाबरू नका आणि यश मिळेपर्यंत चालत राहा' हा 'सक्सेस' मंत्र लक्षात घेत त्यांनी प्रयत्न चालू ठेवले.
2018 मध्ये त्यांनी 212व्या रँकसह आयएएस बनण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले.
R