अनुराधा धावडे
राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण केली.
ज्यांच्या अवतीभोवती राज्य आणि केंद्रातील राजकारण फिरतं त्या शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे आज वडिलांप्रमाणेच सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
शरद पवार यांच्यानंतर पवारांचा उत्तराधिकारी कोण असेल, राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार, असे प्रश्न पुढे आले की सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येतं.
इतकचं काय तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणूनही सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा असते
थेट संसदेतून आपली राजकीय कारकिर्द सुरु करणाऱ्या सुप्रिया सुळे दिल्लीत महाराष्ट्रातील अनेक मुद्दे प्रखरपणे मांडताना दिसतात.
आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकं, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू या गोष्टींचं वाटप करण्याच आवाहन केलं आहे.
आतापर्यंत सलग सात वेळा सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
वडिलांप्रमाणे सुप्रिया सुळे यादेखील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौरे करताना दिसतात.
कधी कोणाच्या घरी गेल्या तरी जमिनीवर बसूनच जेवण करतात, तर कधी रस्त्यात भाजीवाल्या महिलांकडून भाजी घेताना दिसतात, तर आषाढी वारीत डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांसोबत चालतानाही त्या दिसतात