सरकारनामा ब्यूरो
विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा दणदणीत विजय.
अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा तब्बल सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे.
मुळचे चंद्रपूरचे असलेले सुधाकर आडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते आहेत. गणिताचे शिक्षक असलेले आडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचारधारेच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत.
सुधाकर अडबाले यांच्या विजयाची 'चार' कारणे काय आहेत? हे जाणून घेऊया..
जनसंपर्क वाढवला
अडबाले यांनी मागील दोन वर्षांपासून अधिकृतपणे तयारी सुरु केली होती. दोन वर्षात सहाही जिल्ह्यात संपर्क, संघटनांची बांधणी करत सुधाकर अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला.
गटबाजींचा फायदा अडबालेंना
गाणार यांना भाजपमधीलच गटबाजी भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये सुरुवातीपासून दोन गट होते. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीजा फटका गाणार यांना बसला आहे.
गाणार यांच्यावरच्या नाराजीचा अडबालेंना फायदा
जुन्या पेन्शन योजनेवरुन गाणार यांच्या विरोधात शिक्षकांची नाराजी होती. त्यामुळे शिक्षकांनी काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या पारड्यात मते टाकली.
एकसंघ होऊन निवडणूक लढल्याचा काँग्रेसला फायदा
महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय साधत अडबाले यांच्या विजयासाठी एकसंघ पणे मैदानात उतरली. त्यामुळे अडबालेंच्या विजय झाला.