Aslam Shanedivan
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगांव या लहानशा गावातील सुजाताची निवड इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे.
सुजाता रामचंद्र मडके इस्रोमध्येही झळकणार असून ती याआधी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत होती.
सुजाता आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ या पदावर सुजाता रुजू झाली आहे
सुजाताचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झाले असून ग. वि.खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे.
सुजाताचे वडील रामचंद्र ठाणे जिल्हा परिषदेत वरिष्ठ लिपिक पदावर काम करत असून आई सविता गृहिणी आहेत
तिने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट -३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे.
इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून निवड होण्याआधी सुजाताने डीआरडीओ, भाभा अणु संशोधन आणि ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत धडक मारलेली आहे
पण आता ती इस्रोच्या बेंगळुरू कार्यालयात सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर असून तिचे पद पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 10 इतक्या उच्च दर्जाचे आहे.