Rashmi Mane
अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनेत्रा वहिनींचा आज ६० वा वाढदिवस आहे.
त्यानिमित्त रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांची सुनेत्रा पवारांबद्दलची भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे.
रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या जाऊबाई म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
'पवार कुटुंबात सध्या कितीही मतभेद असले तरी 'पवार' कुटुंबीय मनाने एकच आहेत हेच या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.
अजित पवार जेवढे राजकारणात सक्रिय आहेत, तेवढ्याच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या समाजकारणात खंबीर आहेत.
सुनेत्रा पवार या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.
विद्या प्रतिष्ठान या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम करतात.
२०११ पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता (World Entrepreneurship Forum) मंचाच्या थिंक टँक सदस्यदेखील आहेत.