Sunil Dutt Death Anniversary: अभिनेता ते खासदार ! सुनिल दत्त यांनी 'या' क्षेत्रातही केलयं काम

Rashmi Mane

अविस्मरणीय काम

बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपटात काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

Sunil Dutt | Sarkarnama

चाहत्यांवर जादू

आज सुनील दत्त या जगात नाहीत, तरीही त्यांच्या अभिनयाची जादू त्यांच्या चाहत्यांवर कायम आहे. 

Sunil Dutt | Sarkarnama

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त असे होते. सुनील यांनी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयातून जवळपास चार दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Sunil Dutt | Sarkarnama

फाळणीच्या वेळी भारतात

अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी नावाच्या गावात झाला होता. फाळणीच्या वेळी त्याचे कुटुंब भारतात स्थायिक झाले.

Sunil Dutt | Sarkarnama

कंडक्टरची नोकरी

सुनील दत्त अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारली.

Sunil Dutt | Sarkarnama

रेडिओ निवेदक म्हणून केले काम!

सुनील दत्त यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील करिअरची सुरुवात रेडिओपासून केली होती. ते रेडिओ ‘सिलोन’मधील सर्वात प्रसिद्ध हिंदी निवेदक होते. 

Sunil Dutt | Sarkarnama

पहिला चित्रपट

सुनील दत्त यांनी 1955 मध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती. 

Sunil Dutt | Sarkarnama

दोन वेळा खासदार

अभिनयातच नव्हे, तर सुनील दत्त यांनी राज्यसभेत दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी मनमोहन सिंह सरकारमध्ये युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे.

Sunil Dutt | Sarkarnama

Next : 'या' आहेत राजकारणातील आघाडीच्या महिला नेत्या