Jagdish Patil
अनेकजण महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच UPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात.
मात्र, सुनील कुमार बर्नवाल यांचा IAS अधिकारी होण्याचा प्रवास बालपणापासूनच सुरू झाला होता.
त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 3 सुवर्णपदक मिळवली. त्यानंतर GAIL मध्ये काम करायला सुरूवात केली.
GAIL मध्ये काम करतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली आणि 1995 मध्ये त्यांनी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेत यश मिळवलं.
मात्र, पहिल्याच मुलाखतीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरच्या मुलाखतीत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला.
सुनील कुमार हे बिहारमधील IAS अधिकारी असून त्यांनी UPSC पहिल्या क्रमांकाने क्रॅक केली आहे. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते.
त्यांनी भागलपूरमधील बरारी येथील RHBT हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ISM धनबाद येथे पेट्रोलियम अभियांत्रिकी करण्याचा निर्णय घेतला.
सुनील कुमार यांची झारखंडमधील पहिली नियुक्ती ही त्यांच्या सरकारी सेवेतील एक प्रतिष्ठित कारकीर्द आहे. सध्या ते भारत सरकारमध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम करत आहेत.