IPS Meera Borwankar : अजितदादांवर गंभीर आरोप करणाऱ्या 'सुपरकॉप' मीरा बोरवणकर आहेत तरी कोण ?

Rashmi Mane

‘मॅडम कमिशनर’

माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहे.

IPS meera borwankar | Sarkarnama

बोरवणकर

बोरवणकर यांनी पुस्तकामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.

IPS meera borwankar | Sarkarnama

कोण आहेत मीरा बोरवणकर ?

'आयपीएस' मीरा बोरवणकर यांना फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात 'सुपरकॉप' म्हणून ओळखले जाते.

IPS meera borwankar | Sarkarnama

पंजाबच्या रहिवाशी

बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

IPS meera borwankar | Sarkarnama

2017 ला निवृत्त

त्या 1981 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी असून, त्या 2017 ला निवृत्त झाल्या.

IPS meera borwankar | Sarkarnama

शिक्षण

बोरवणकर यांचे वडील ओ. पी. चढ्ढा हे सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे होती. मीरा यांनी शालेय शिक्षण फाजिल्का येथेच पूर्ण केले.

IPS meera borwankar | Sarkarnama

माफिया राज संपवण्यात महत्त्वाची भूमिका

'आयपीएस' पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मीरा बोरवणकर यांना महाराष्ट्र केडरचा पदभार मिळाला. मुंबईतील माफिया राज संपवण्यात बोरवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

IPS meera borwankar | Sarkarnama

अंडरवर्ल्डमध्येही दहशत

दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेक लोकांना तुरुंगात टाकले आहे, त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती.

IPS meera borwankar | Sarkarnama

कसाब आणि याकूब मेमनला यांच्या कार्यकाळात फाशी

2008 च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला बोरवणकर यांच्या देखरेखीखाली फाशी देण्यात आली.

IPS meera borwankar | Sarkarnama

Next : भारतातील 'टॉप' १० महिला 'आयपीएस' अधिकारी 

येथे क्लिक करा