आजोबांच्या संपत्तीत नातवाला हिस्सा नाही; न्यायालयाचा निकाल काय?

Roshan More

ऐतिहासिक निकाल

सुप्रीम कोर्टाने वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्व-अर्जित मालमत्ता यामधील कायदेशीर फरक स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालामुळे मालमत्तेच्या अधिकारांबाबतचे अनेक गैरसमज दूर झाले आहेत.

Supreme Court | Sarkarnama

आजोबांच्या मालमत्तेचे स्वरूप

आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेची कायदेशीर वारसांमध्ये विभागणी झाली असेल, तर वडिलांच्या वाट्याला आलेली ती मालमत्ता त्यांची 'वैयक्तिक मालमत्ता' बनते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property

नातवाचा जन्मसिद्ध हक्क नसतो

वडिलांच्या अशा स्वतंत्र किंवा वैयक्तिक मालमत्तेवर मुलाचा किंवा नातवाचा जन्माने कोणताही हक्क राहत नाही. वडील या मालमत्तेचे संपूर्ण मालक असतात, त्यामुळे मुलाला त्यात हक्क मागता येत नाही.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property

चेन्नई प्रकरणातील पार्श्वभूमी

चेन्नईमधील दिवंगत एन. रामकृष्णन यांच्या मालकीच्या १,८११ चौरस फूट मालमत्तेवरून हा वाद सुरू झाला होता. रामकृष्णन यांच्या मृत्यूनंतर १९९४ मध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यात कायदेशीररीत्या मालमत्तेची औपचारिक विभागणी झाली होती.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property

मुलाने आपला वाटा विकला

औपचारिक विभागणी झाल्यानंतर, रामकृष्णन यांच्या मुलाने आपल्या वाट्याला आलेली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकली. या विक्रीनंतर मालमत्तेच्या मालकी हक्कावरून कायदेशीर लढा सुरू झाला.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property

नातवाकडून न्यायालयात अपील

विक्री झालेल्या मालमत्तेमध्ये आपल्याला अर्धा हिस्सा हवा, अशी मागणी करत रामकृष्णन यांच्या अल्पवयीन नातवाने न्यायालयात धाव घेतली. आपण जन्माने सहवारस असल्याचा दावा त्याने याचिकेत केला होता.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property

अपील फेटाळले

न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या खंडपीठाने सुनावणी अंतीम करत अल्पवयीन मुलाचे अपील फेटाळून लावले. वडिलांच्या वाट्याची वैयक्तिक झालेली मालमत्ता ते स्वेच्छेने विकू शकतात, असा निर्णय दिला.

Supreme Court judgment on grandson rights in grandfather property | Sarkarnama

हिंदू कायद्यानुसार मालमत्तेचे दोन प्रकार

हिंदू कायद्यानुसार मालमत्तेचे ‘वडिलोपार्जित’ आणि ‘स्व-अर्जित’ असे दोन प्रकार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीत मुलांचा जन्मतः हक्क असतो, परंतु कायदेशीर विभागणीनंतर मिळालेला हिस्सा वडिलांची वैयक्तिक मालमत्ता बनतो.

Women Property Benefits, | AI Image