Aslam Shanedivan
फडणवीस सरकारने बदल्यांचा सिलसीला कायम ठेवत नुकताच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
राज्यातील गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासन आदेश जारी करत 16 वरिष्ठ IPS आणि RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
या आदेशाप्रमाणे विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांची बदली करण्यात आली आहे.
डॉ. वैशाली कडुकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर डॉ. वैशाली कडुकर यांच्या जागी सूरज गुरव यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या पूर्वीच्या कारकिर्दीची आणि आक्रमक कार्यशैलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
२०१९ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान त्यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वाद घातला होता. ज्याची राज्यभर चर्चा झाली होती.
गुरव यांची कराडमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून २२ सप्टेंबर २०१९ रोजी बदली झाली होती. त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर भूमिका घेतली होती.