Richest Saints of India: भारतातील या बाबांकडे आहे करोडोंची संपत्ती; वार्षिक उत्त्पन्न शेकडो कोटींच्या घरात

अनुराधा धावडे

वादग्रस्त धर्मगुरु नित्यानंद हे देशातील सर्वात श्रीमंत बाबांपैकी एक आहेत. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, नित्यानंद यांच्याकडे एकूण 10 हजार कोटींची संपत्ती आहे.

Swami Nithyananda | Sarkarnama

आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहेत. आसाराम ट्रस्टची एकूण उलाढाल 350 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर आसाराम बापू एकूण 134 दशलक्ष डॉलर्सचे मालक आहेत.

Asaram Bapu | Sarkarnama

योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली आहे. बाबा रामदेव सोळाशे कोटी रुपयांचे मालक आहेत.

Baba Ramdev | Sarkarnama

श्री-श्री रविशंकर हे देशातील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक आहेत. त्यांच्याकडे विविध आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन केले जाते. श्री-श्री रविशंकर यांच्याकडे एक हजार कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती आहे.

Sri Sri Ravishankar | Sarkarnama

देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृतानंदमयी यांचा समावेश होतो. माता अमृतानंदमयी या केरळच्या असून त्यांच्याकडे एकूण पंधराशे कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Mata Amritanandamayi | Sarkarnama

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव हे देखील करोडोंचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

Sadhguru Jaggi Vasudev | Sarkarnama
येथे क्लिक करा