Roshan More
स्वप्नील कुसळेने 50 मी. रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटात कांस्यपदक जिंकले.
स्वप्नील कुसळे रेल्वेत नोकरी टीसीची नोकरी करत आहे.
स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. त्याचे वडील शिक्षिक आहेत. तर, आई गावच्या सरपंच आहेत.
नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.
स्वप्नील एमएस धोनीला आपला आदर्श मानतो. धोनी प्रमाणे स्वप्निल देखील रेल्वेत टीसी आहे.
2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ती मॅच पाहण्यासाठी स्वप्नीलने 12 चा पेपर बुडवला होता.
स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य केलं जाईल, अशी घोषणा केली आहे. तसेच स्वप्नील 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले.