सरकारनामा ब्यूरो
26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले असून, त्याला तिहारच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
काय आहे हे अंडा सेल? येथे कोणत्या गुन्हेगारांना ठेवले जाते जाणून घेऊयात.
1926 या तुंरुगाची स्थापना करण्यात आली होती. या कक्षाचा आकार अंड्यासारखा असल्याने याला 'अंडा सेल' म्हटले जाते.
'अंडा सेल'ला अतिशय सुरक्षित, जुने आणि अभेद्य कारागृह मानले जाते.
येथे गंभीर गुन्हेगारांना आणि धोकादायक कैदींना ठेवले जाते. याकुब मेनन, अफजल गुरु, अबू सालेम, अजमल कसाब, अभिनेता संजय दत्त यांना येथे ठेवण्यात आले होते.
या तुरुंगात वीज कनेक्शन नसते. कैदींना एका अंधार खोलीत राहावे लागते. त्यांना फक्त झोपण्यासाठी एक बेड दिला जातो.
येथे अनेक सुरक्षा रक्षक तैनात असतात. कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांवर, फोन काॅलवर विशेष लक्ष ठेवले जाते.
कैद्यांना ठेवले जाणारे कक्ष हे बॉम्बप्रुफ असतात. सुरक्षतेसाठी जागोजागी सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 8 अंडा सेल आहेत.