Mangesh Mahale
पंतप्रधान नरेंद्र मोदी-इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
टेस्लाने भारतात 13 वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
मुंबई आणि दिल्लीमध्ये सर्व्हिस टेक्नीशियनसह कमीत कमी 5 पदांवर भरती केली जात आहे.
कस्टम एंगेजमेंट मॅनेजर आणि इतर पदांसाठी फक्त मुंबईत जागा रिक्त आहेत.
या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्ही टेस्ला मोटर्सच्या लिंक्डइन पेजला भेट देऊन अर्ज करू शकता.
भारताने आता 40 हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांवरील कस्टम ड्युटी 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांवर कमी केली आहे.
टेस्ला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत त्यांचा व्यापार विस्तार करण्याची शक्यता आहे.
टेस्लाच्या एन्ट्रीमुळे भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारालाही फायदा होईल.