Ganesh Thombare
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडच असतानाच भास्कर जाधव हे शेती कामात रमले आहेत.
भास्कर जाधव हे राजकारणातून अवर्जून वेळ काढत शेतीत काम करतात.
शेतीमध्ये नांगरणी करत आमदार भास्कर जाधवांनी भात पिकाची लावणी केली.
पॉवर टिलरने नांगरणी करत भास्कर जाधवांनी भाताची लावणी केली.
भात पिकाची लावणी करताना शेताच्या बांधावर बसून भाजी-भाकरीवर त्यांनी ताव मारला.
भास्कर जाधव दरवर्षी न चुकता आपल्या कुटुंबासोबत शेती करताना दिसतात.
राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी त्यांनी आपली गावाकडची शेती सोडली नाही.
भास्कर जाधव हे सध्या आमदार असून ते शिवसेना (ठाकरे गट) नेते आहेत.