Manisha Kayande Political Journey : ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करुन शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा; कायंदेंचा 'असा' आहे राजकीय प्रवास

Deepak Kulkarni

शिवसेनेच्या आमदार व प्रवक्त्या

मनिषा कायंदे या विधान परिषेदेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

शिंदे गटाच्या वाटेवर

ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करुन शिंदे गटाच्या वाटेवर असल्यामुळे त्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी...

प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

स्वतंत्र राजकीय ओळख

काही महिला राजकारण्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. मनिषा कायंदे या त्यापैकीच एक आहे.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

अन्यायाविरोधात आक्रमक...

केवळ महिलांच्याच प्रश्नांवर नाही तर राज्यातील प्रत्येक प्रश्नांसह पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या आवाज उठवत असतात.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

भाजपमधून सुरुवात

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

नगरपालिका, विधानसभेच्या निवडणुकीत पराभव

1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्यात निसटता पराभव झाला. पुढे 2009मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेची लाट असल्याने त्यांचा पराभव झाला.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश...

पुढे 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

ठाकरेंनी शब्द पाळला...

उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला. त्यांना विधान परिषदेवर पाठवलं.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

शिवसेनेत नाराज...

ठाकरे गटातील एक आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे.

Manisha Kayande Political Journey | Sarkarnama

NEXT : वडिलांचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्रातील तरूण राजकीय नेते; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा....