अनुराधा धावडे
स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात अनेक वेळा मोठे बदल घडवून आणणारे टर्निंग पॉइंट्सही पाहायला मिळतात.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय वारशाचे उत्तराधिकारी मानले जाणारे संजय गांधी यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला होता, त्यानंतर देशाची राजकीय दिशा बदलली होती.
संजय गांधी पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री अशा कोणत्याही घटनात्मक पदावर कधीच राहिलेले नाहीत. पण काँग्रेस पक्षात त्यांचा दर्जा आणि हस्तक्षेप प्रचंड होता.
23 जून 1980 रोजी सकाळी संजय गांधी नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ दिल्ली फ्लाइंग क्लबचे नवीन विमान उडवत होते.
विमान उडवत असताना त्यांनी एरोबॅटिक अॅक्रोबॅटिक्स करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांचा विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमानाचा अपघात झाला.
या अपघतात डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संजय गांधी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्या वारसाची चर्चा सुरू झाली
अखेर राजीव गांधींना त्यांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात उतरावे लागले आणि त्यांच्या आईचे मन राखावे लागले. पुढे ते देशाचे पंतप्रधानही झाले.
संजय गांधी त्यांच्या आईप्रमाणेच काँग्रेसचा कारभार चालवत होते. आणीबाणीच्या काळातील लागलेल्या आरोपाप्रकरणी इंदिरा गांधींना अटक करण्यात आली
देशभरातून इंदिरा गांधी यांच्याबाबत सहानुभूती वाढत गेली. १९८० मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या
संजय गांधी यांनी केलेल्या कामांमुळे आणि १९८० च्या निवडणुकीत चमत्कारिकरित्या काँग्रेस आणि इंदिरा गांधींचा दणदणीत विजय झाला.