Deepak Kulkarni
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बुधवारी(दि.१०) मतदान झालं आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लावल्या होत्या.
राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत.
जेडीएस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनीही मतदान केलं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपल्या पत्नीसह मतदानासाठी हजेरी लावली.
काँग्रेस नेते व मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील उमेदवार डी के शिवकुमार यांनीही मतदान केलं.
बसवराज बोम्मई यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते बी.एस. येदियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाय विजयेंद्र यांनी वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपा, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच कारणामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.