सरकारनामा ब्यूरो
अमित विलासराव देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 ला लातूर जिल्हातील बाभुळगावच्या देशमुख यांच्या राजकीय घराण्यात झाला.
दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.
राजकारणाचे स्वरुप कितीही बदलले असले तरी अमित देशमुख यांनी लातूरकरांची मने आजही जिंकलेली आहेत.
लातूरकरांची नाळ आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळेच विलासरावानंतरही त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवला आहे.
विलासरावांचे अकाली निधन, 2014 मध्ये मोदी लाट आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा विरोधकांचा कोणताही परिणाम अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर झाला नाही.
त्यांची पक्षावर असलेली निष्ठा आणि लातूर जिल्ह्यातील काँग्रेस उभारणीमध्ये त्यांचे योगदान पाहून त्यांना मंत्रीमंडळात देखील प्रतिनिधित्व मिळाले.
नगरपरिषद निवडणुकीतून अमित देशमुख यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली.
वयाच्या 19 व्या वर्षापासून त्यांनी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रचार केला.