सरकारनामा ब्यूरो
1947 पासून आतापर्यंत 89 वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 26 अर्थमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. यापैकी 10 वेळा मोरारजी देसाईंनी सर्व अर्थमंत्र्यांपेक्षा जास्त अर्थसंकल्प मांडले आहेत.
पी.चिदंबरम यांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आठवेळा बजेट सादर केले होते.
सी. डी. देशमुख यांनी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
यशवंत सिन्हा यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
मनमोहन सिंह यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
यशवंतराव चव्हाण यांनी 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
टी. के. कृष्णमुर्ती यांनी 5 वेळा बजेट सादर केले होते.
अरुण जेटली यांनी 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.