New Parliament see photos : समोर आले नवीन संसद भवनाचे 'खास' फोटो ! जाणून घ्या, नवीन संसद भवनात काय आहे विशेष?

Rashmi Mane

काय आहे विशेष ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीविषयी संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. संसदेची जुनी इमारत आणि नव्या इमारतीमध्ये काय आहे विशेष ?

New Parliament House | Sarkarnama

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली. 

New Parliament House | Sarkarnama

सोयी- सुविधांनी युक्त

नवीन बांधल्या गेलेल्या संसद भवन सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मजबूत आहे. खासदारांच्या आसन व्यवस्थेबरोबरच येथील ग्रंथालय, विश्रामगृह आणि चेंबर्सही आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहेत.

New Parliament House | Sarkarnama

मुख्य तीन दरवाजे

संसद भवनाचा संपूर्ण कॅम्पस 64,500चौरस मीटर आहे. ही इमारत त्रिकोणी आकाराची चार मजली आहे. येथे ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत. नवीन संसद भवन टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने बांधले आहे.

New Parliament House | Sarkarnama

गुजरातचे आर्किटेक्ट

गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म 'एचसीपी' डिझाईन्सने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य 'आर्किटेक्ट बिमल पटेल' आहेत. या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजक्टने 862 करोड रुपयांमध्ये केली आहे. 

New Parliament House | Sarkarnama

प्रशस्त आसन व्यवस्था

लोकसभेत खासदारासाठी सुमारे 888 आणि राज्यसभा खासदारासाठी सुमारे 326 पेक्षा जास्त सीट्स असणार आहेत. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता असेल. 

New Parliament House | Sarkarnama

सभागृह असणार राष्ट्रीय पक्षी आणि पुष्पा प्रमाणे ...

नवीन संसद भवनात लोकसभा सभागृह राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकारात असणार आहे, तर राज्यसभा सभागृह राष्ट्रीय पुष्प कमळाच्या आकारात तयार झाली आहे.

New Parliament House | Sarkarnama

हायटेक इमारत

ही इमारत भूकंप प्रतिरोधक डिझाइनमध्ये तयार करण्यात आली आहे. प्रत्येक सदस्याच्या आसनावर डिजिटल प्रणाली युक्त कम्पुटर आणि टच स्क्रीन आहे. म्हणजेच संसदेची नवीन इमारत हायटेक असणार आहे.

New Parliament House | Sarkarnama

Next : 'या' आहेत राजकारणातील आघाडीच्या महिला नेत्या