Rashmi Mane
पाकिस्तान अनेकदा राजकारण, क्रिकेट, आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे चर्चेत असतो. मात्र, याशिवायही पाकिस्तान आणखी काही खास गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
ज्या गोष्टी फक्त पाकिस्तानातूनच जगभरात पोहोचतात. चला तर मग पाहूया अशाच चार अनोख्या गोष्टी, ज्या केवळ पाकिस्तानमधूनच मिळतात...
हे मीठ पंजाबमधील खेवड़ा खाणीतून मिळते आणि जगातील सर्वात जुने मीठ मानले जाते. अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये याची मोठी मागणी आहे.
सियालकोटमध्ये तयार होणाऱ्या हाताने शिवलेल्या फुटबॉल्स, कुशल कारागीरांच्या मेहनतीमुळे हे फुटबॉल्स उच्च दर्जाचे बनतात त्यामुळे फीफासुद्धा हे फुटबॉल वापरते.
पाकिस्तानातील सिंधरी आंबा त्यांच्या गोडसर, रेशमी आणि हलक्या पिवळ्या गाभ्यामुळे प्रसिद्ध आहे. हा आंबा जगभरात निर्यात केला जातो.
पाकिस्तान उच्च गुणवत्तेची सर्जिकल उपकरणे तयार करतो, ज्यांची अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे.