सरकारनामा ब्यूरो
आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे (ठाकरे गट) प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत.
सुनिल तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.
प्रणिती शिंदे ह्या, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.
विश्वजीत कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.
अमित देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र तर अभिनेता रितेश देशमुख व आमदार धीरज देशमुख यांचे मोठे भाऊ आहेत.
पुनम महाजन या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन ह्यांच्या कन्या आहेत.
सिद्धार्थ शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत.