सरकारनामा ब्यूरो
आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे. या खास दिवशी जाणून घेऊया राजकीय नेत्यांची 'प्यार वाली लवस्टोरी'.
मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ तर गुरशरण कौर शिक्षिका होत्या. दोघांमधील साधेपणा एकमेकांना आवडत गेला यानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नगाठ बांधली.
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची भेट वयाच्या 13व्या वर्षी झाली. शाळेत असताना त्यांच्यात मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या जोडप्याने 18 फेब्रुवारी 1997ला लग्न केले.
एस. जयशंकर आणि क्योको यांची भेट जयशंकर टोकियो येथील भारतीय दूतावासात मिशन उपप्रमुख म्हणून तैनात असताना झाली. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.
ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे यांचा विवाह 12 डिसेंबर 1994 ला प्रियदर्शिनी यांच्याशी झाला.1991 मध्ये एका मित्राच्या पार्टीत ज्योतिरादित्यांनी त्यांना पहिले पहिल्या भेटीतच ते त्यांच्या प्रेमात पडले.
रश्मी ठाकरे एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली होती. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. 13डिसेंबर 1988 ला हे जोडीने लग्न केले.
रवी राणा रामदेव बाबांच्या योग शिबिरात गेले होते. यांचदरम्यान त्यांची भेट नवनीत कौर यांच्याबरोबर झाली. तिथेच प्रेमात पडलेल्या जोडीने 2 फेब्रुवारी 2011ला सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले.
लालू प्रसाद यादव आणि राबडी देवीचे कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्या कुंटुंबाचा लग्नाला पूर्णपणे विरोध होता.पण लालूंनी राबडी देवी त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरल्याने कुटंबाने त्याचे लग्न करून दिले .
सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांची पहिली भेट लंडनमध्ये कॉलेजच्या दिवसात झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याची ठरवले पण कुटुंबांकडून तीव्र विरोध झाला तरीही या जोडीने जानेवारी 2004 मध्ये साध्या पद्धतीने लग्न केले.