Amit Ujagare
पाऊस मुख्यतः रेन गेज (Rain Gauge) या उपकरणाने मोजला जातो. रेन गेज कसा असतो? हा एक सामान्यतः २० सेमी व्यासाचा उघड्या तोंडाचा सिलिंडर असतो.
हा रेन गेज जमिनीपासून ३० सेमी उंचीवर ठेवला जातो, जेणेकरून पाणी उडून जाऊ नये किंवा झाडं किंवा इमारतींचा त्याला अडथळा येऊ नये.
या रेन गेजच्या आत पडलेल्या पाण्याची उंची (depth) मोजली जाते. ही उंची मिलिमीटर (mm) मध्ये मोजली जाते.
याकामात आता टिपिंग बकेट सारखे आधुनिक ऑटोमॅटिक रेन गेज वापरले जातात, जे प्रत्येक मिनिटाला डेटा रेकॉर्ड करतात.
१ मिलिमीटर पाऊस म्हणजे जर पडलेल्या पावसाचे पाणी कुठेही वाहून गेले नाही, त्याचे बाष्पीभवन झाले नाही आणि जमिनीवर समानरित्या १ मिलिमीटर जाडीचा पाण्याचा थर साचला तर त्याला १ मीमी पाऊस पडला असं म्हणतात.
१ चौरस मीटर क्षेत्रफळावर १ लिटर पाणी पडले. १ हेक्टर शेतीवर १०,००० लिटर (१० किलोलीटर) पाणी पडले. १ चौरस किलोमीटर क्षेत्रावर १०,०००,००० लिटर (१०,००० किलोलीटर किंवा १० दशलक्ष लिटर) पाणी.
हलका पाऊस : ०–२.५ mm/तास, मध्यम पाऊस : २.५–७.५ mm/तास, मुसळधार पाऊस : ७.५–१५ mm/तास त्याहून अधिक, अतिवृष्टी : १२४.५ mm किंवा अधिक एका दिवसात पडलेला पाऊस
हवामान खात्याच्या माहितीनुसार, २४ तासांत पडलेला ६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस म्हणजे जोरदार पाऊस, ११५.६ ते २०४.४ मिमी इतक्या पावसाला दमदार पाऊस तर २०४.५ मिमी किंवा त्याहून अधिका पाऊस झाल्यास त्याला अतिवृष्टी मानलं जातं.