Pradeep Eshwar: अनाथ मुलाने केला आरोग्यमंत्र्यांचा पराभव; कोण आहेत प्रदीप ईश्वर?

Ganesh Thombare

सर्वाधिक चर्चेत

कर्नाटकात काँग्रेसचे 135 आमदार निवडून आले. यापैकी चिक्कबल्लापूर मतदारसंघातून निवडून आलेले प्रदीप ईश्वर सर्वाधिक चर्चेत आहेत.

आरोग्यमंत्र्यांचा पराभव

प्रदीप ईश्वर यांनी विद्यमान आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा 10 हजार मतांनी पराभव करत ते आमदार झाले.

आंदोलनातून राजकारणात

प्रदीप ईश्वर हे 2016 साली एका आंदोलनातून चर्चेत आले अन् त्यांनी सरकारविरोधात रान पेटवत राजकारणात एन्ट्री केली.

लोकांची मने जिंकली

प्रदीप ईश्वर यांनी आपल्या भाषणांनी लोकांची मने जिंकली. त्यांची प्रचारातली भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अनाथ मुलगा झाला आमदार

निवडून आल्यानंतर गरीब कुटुंबातील अनाथ मुलाला काँग्रेसने तिकीट दिले आणि मी आमदार झालो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आंबेडकरांच्या फोटोसमोर नतमस्तक

कर्नाटकच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रदीप ईश्वर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर नतमस्तक झाले.

अनेकांसाठी प्रेरणादायी

एका सर्वसामान्य तरुणाने आरोग्यमंत्र्यांचा पराभव केल्यामुळे प्रदीप ईश्वर यांचा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Next : स्वातंत्र्यापूर्वी जन्म, राजकारणात प्रवेश अन् कर्नाटकचे मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांचा असा आहे राजकीय प्रवास?