K Padmarajan : कोण आहे 'वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर'? 238 पराभवानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

Rashmi Mane

निवडणुकीचे बिगुल वाजले आहे

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 18व्या लोकसभेसाठी पुढील महिन्याच्या 19 तारखेपासून ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

K Padmarajan | Sarkarnama

पराभवासाठी जगभर प्रसिद्ध

त्याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. दरम्यान, तामिळनाडूतून एका उमेदवाराबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. जो आपल्या विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

K Padmarajan | Sarkarnama

'वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर'

तामिळनाडूतील के पद्मराजन यांना इलेक्शन किंगसह 'वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर' ही पदवी मिळाली आहे.

K Padmarajan | Sarkarnama

2024 लढवण्याची तयारी

एक नाही दोन नाही तब्बल 238 वेळा निवडणूक हरलेल्या पद्मराजन यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक 2024 लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

K Padmarajan | Sarkarnama

मूळचे तामिळनाडूचे रहिवासी

पद्मराजन तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

K Padmarajan | Sarkarnama

238 निवडणुका लढवल्या आहेत.

आतापर्यंत त्यांनी राष्ट्रपतिपदापासून ते स्थानिक निवडणुकांपर्यंत देशभरातील निवडणुका लढवल्या आहेत.

K Padmarajan | Sarkarnama

पराभवाचा सामना

पद्मराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांचा सामना केला आहे. मात्र,, पद्मराजन यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

K Padmarajan | Sarkarnama

'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'

पद्मराजन यांनी भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळवले आहे. 2011 मध्ये मेत्तूर विधानसभा निवडणुकीत उभे असताना त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

R

K Padmarajan | Sarkarnama

Next : या 'दहा' मुख्य सचिवांनी महाराष्ट्रात गाजवली कारकीर्द

येथे क्लिक करा