सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल साडी नेसतं, टॅबलेटद्वारे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली.
2019: निर्मला सीतारामन यांनी ब्रीफकेस आणणे बंद केले
अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच निर्मला सीतारामन यांनी ब्रिटीश काळापासूनची परंपरा संपवली. २०१९ पर्यंत अर्थसंकल्प ब्रीफकेस किंवा सुटकेसमध्ये सादर केला जात असे. निर्मला सीतारामन 2019 मध्ये ब्रीफकेसऐवजी लाल कापडाच्या पिशवीत बजेट पेपर्स घेऊन संसदेत आल्या होत्या.
2020 : सर्वाधिक प्रदीर्घ भाषण देण्याचा विक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे.
2021: 2021 मध्ये डिजिटल बजेट सादर करणाऱ्या सीतारामन या पहिल्या अर्थमंत्री आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये पहिल्यांदाच संपूर्णपणे पेपरलेस डिजिटल बजेट संसदेत सादर करण्यात आले.
2022: गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी गडद तपकिरी रंगाची साडी नेसली होती.