Timeline: 'मालेगाव' प्रकरणी कोणाला कधी झाली अटक? कोर्टात काय काय घडलं?

Amit Ujagare

बॉम्बस्फोट

2008 : २९ सप्टेंबर २०२८ रोजी मालेगाव शहरातील भिकू चौकातील मशिदीबाहेर एका स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवून त्याचा स्फोट घडवून आणला गेला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिकजण जखमी झाले होते.

Malegaon Bomb Blast

चार्जशीट दाखल

2009 : स्थानिक पोलिसांकडून एटीएसनं तपास हाती घेतल्यानंतर २० जानेवारी २००९ मध्ये एटीएसच्या विशेष कोर्टानं ११ आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यानुसार आरोपींवर मकोका, युएपीए आणि आयपीसी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल.

Malegaon Bomb Blast

मकोकाला विरोध

2010 : प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावता येणार नाही, हा विशेष कोर्टाचा आदेश हायकोर्टानं बदलला. त्यानंतर प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.

Malegaon Bomb Blast

एनआयएकडं चौकशीची धुरा

2011 : १ फेब्रुवारी रोजी एटीएसनं प्रवीण मुतालिक या एका व्यक्तीला अटक केली. त्यामुळं एकूण आरोपींची संख्या १२ झाली. १३ एप्रिलला एटीएसकडून एनआयएकडं चौकशीची धुरा.

Malegaon Bomb Blast

एकूण १४ जण अटकेत

2012 : फेब्रुवारी ते डिसेंबर दरम्यान एनआयएनं लोकेश शर्मा आणि धनसिंह चौधरी यांना अटक केली. त्यामुळं एकूण १४ लोक अटकेत.

Malegaon Bomb Blast

मकोका हटवला अन् क्लीनचीट

2015-16 : एप्रिल २०१५ मध्ये मकोकावर निर्णयासाठी सुप्रीम कोर्टांन प्रकरण पुन्हा विशेष एनआयए कोर्टाकडं पाठवलं. फेब्रुवारी २०१६ मध्ये विशेष कोर्टानं सांगितलं की मकोका लावण्यासाठी अॅटर्नी जनरल यांचा सल्ला घेण्यात आला आहे. मे २०१६ मध्ये एनआयएनं चार्जशीट दाखल केली. मकोकाची कलमं हटवली आणि सात आरोपींना क्लीनचीट दिली.

Malegaon Bomb Blast

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जामीन

2017-18 : २५ एप्रिलला साध्वी प्रज्ञासिंह यांना हायकोर्टानं दिला जामीन, प्रसाद पुरोहित यांना जामीन नाकारला. २१ सप्टेंबरला पुरोहित यांना सुप्रीम कोर्टानं दिला जामीन. २०१७ च्या शेवटापर्यंत उरलेल्या सर्व सात आरोपींना जमीन मिळाला. २७ डिसेंबरला कालसांगरा, साहू आणि प्रवीण मुतालिक यांची सुटका केली. ३० ऑक्टोबरला सात आरोपींविरोधात आरोप निश्चिती.

Malegaon Bomb Blast

साक्ष बदलली

2023 : सप्टेंबर महिन्यात फिर्यादी पक्षानं ३२३ साक्षीदारांना कोर्टात सादर केलं. चौकशीत ३७ साक्षीदारांनी साक्ष बदलली.

Malegaon Bomb Blast

अंतिम जबाब नोंदवला

2024 : २३ जुलै रोजी बचाव पक्षानं आठ साक्षीदारांना कोर्टात हजर केलं. त्यांची चौकशी पूर्ण झाली. १२ ऑगस्टला विशेष कोर्टानं सर्व आरोपींचा अंतिम जबाब नोंदवला. तसंच फिर्यादी आणि बचाव पक्षाला शेवटच्या युक्तीवादाची संधी दिली.

Malegaon Bomb Blast

सर्व आरोपींची सुटका

2025 : १९ एप्रिलला विशेष कोर्टानं सर्व पक्षांचं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी संपवली. ३१ जुलै रोजी विशेष एनआयए न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी सबळ पुरावे नसल्याचं सांगत साध्वी प्रज्ञासिंह, निवृत्त लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींची सुटका केली.

Malegaon Bomb Blast