Nusrat Jahan ED Inquiry : 'टीएमसी' खासदार नुसरत जहाँ 'ईडी'च्या चौकशीमुळे चर्चेत ; काय आहे प्रकरण ?

Rashmi Mane

नुसरत जहाँ

'टीएमसी' खासदार नुसरत जहाँला सहा तास 'ईडी'ने पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

ईडी चौकशी

(ईडी) तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या गृहनिर्माण घोटाळ्याच्या चौकशीसाठी जहाँ यांना बोलावले आहे.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

ऑडिट रिपोर्ट

ED ने 7 Sense Infrastructure Pvt Ltd कंपनीच्या ऑडिट रिपोर्टचा मागोवा घेतला आहे. हा तोच ऑडिट रिपोर्ट आहे, ज्यावर नुसरत यांची स्वाक्षरी आहे.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

'स्वतंत्र संचालक'

आर्थिक वर्ष 2015-16 च्या अहवालानुसार नुसरत यांनी मार्च 2017 मध्ये कंपनीचा राजीनामा दिला होता. कंपनीची 'स्वतंत्र संचालक' या नात्याने तिला आर्थिक आणि व्यवहाराच्या तपशिलांची पूर्ण माहिती नव्हती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

चौकशीसाठी

नुसरत जहाॅं यांनी स्वाक्षरी केलेल्या ऑडिट रिपोर्टची चौकशी करण्यासाठी त्यांना 12 सप्टेंबरला 'केंद्रीय एजन्सीच्या सॉल्ट लेक' कार्यालयात तपास अधिकाऱ्यांनी बोलावले होते.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

राजकारणात पाऊल

नुसरत जहाँ या बंगाली सिनेमाची पार्श्वभूमी असलेल्या नेत्या राजकारणात पाऊल ठेवल्यापासून सातत्याने चर्चेत आहेत.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

लोकप्रिय अभिनेत्री

नुसरत जहाँ या लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल तसेच एक अतिशय यशस्वी राजकारणी आहेत. त्यांनी एप्रिल 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसचे (TMC) सदस्यत्व घेत सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

शिक्षण

नुसरत यांचे शिक्षण कोलकाता येथील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन' येथून पूर्ण केले. त्यानंतर भवानीपूर महाविद्यालयातून कॉमर्समधून पदवी घेतली. शालेय जीवनापासून त्या स्पोर्ट्स आणि इतर अॅक्टिव्हिटीजमध्ये सक्रिय होत्या. 

Nusrat Jahan ED Inquiry | Sarkarnama

Next : 'कुली नंबर वन' ; डोक्यावर सुटकेस, हातात बिल्ला... राहुल गांधींचा कुली अवतार

येथे क्लिक करा