Dinvishesh 11 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1675 - शिखांचे नववे गुरू तेगबहादर यांचा औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात वध केला. त्यांचे वधस्थान सीसगंज गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र झाले आहे. त्यांनी विविध विषयांवर 116 पदे रचली होती.

1888 - थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म. त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

1924 - भारतीय अर्थकारणाचे शिल्पकार डॉ. इंद्रवदन गोवर्धनदास ऊर्फ आय. जी. पटेल यांचा बडोदा जन्म. अर्थमंत्रालयात सचिव, सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. 1977 मध्ये ते रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून काढल्या, तसेच रिझर्व्ह बॅंकेमार्फत सरकारी सोन्याचा लिलाव सुरू केला. सहा खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, प्राधान्य क्षेत्राला कर्ज, डिपॉझिट इन्शुरन्स व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विलीनीकरण व रिझर्व्ह बॅंकेची पुनर्रचना हे सगळे त्यांचे निर्णय होते. 1984 मध्ये ते प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सचे संचालक झाले. हे पद भूषविण्याचा मान मिळवणारे ते एकमेव भारतीय.

1947 - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले करण्यात आले.

1965 - दक्षिण ऱ्होडेशियाकडून ब्रिटनपासून स्वातंत्र्य पुकारल्याची घोषणा

1976- संसदेला सर्वश्रेष्ठ दर्जा प्राप्त करुन देणारी आणि मुलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्त्वांना अग्रहक्क मिळवून देणारी ऐतिहासिक घटनादुरुस्ती राज्यसभेत एकमताने मंजूर.

1999 - महाराष्ट्रात तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडून अल्पसंख्याक आयोगाचे पुनरुज्जीवन

2004 - पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेले ज्येष्ठ नेते आणि स्वायत्त पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत यांचे पॅरिसमध्ये निधन. त्यांना 1994 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरविले होते.

2009 - कोकण किनारपट्टीवर फियान चक्रीवादळामुळे हाहाःकार

Next : IPS झाली अभिनेत्री, मोठ्या स्क्रिनवर अजमवणार नशिब

येथे क्लिक करा