Rashmi Mane
1955 - संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन सुरू. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पहिल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला व गोळीबार. या प्रसंगी पंधरा लोक मरण पावले. या आंदोलनात एकंदर 105 जणांचे बळी पडले, असे मानतात.
1962 - भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चिनी सैन्याने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली.
1970 - नोबेल पुरस्कारविजेते भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचे निधन. प्रकाशकिरण विखुरण्यासंबंधीचे संशोधन व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या परिणामांचा (रामन इफेक्ट) शोध यासाठी त्यांना 1930 चा भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
2002 - मराठवाडा मुक्तिसंग्रमातील अग्रणी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन. पद्मविभूषण, डी.लिट ही पदवी, रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार इ. सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
2004 - विश्वकरंडक कबडी स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत जागतिक कबड्डी महासंघाची स्थापना. महासंघाची स्थापना हे मराठमोळा इतिहास असलेला कबड्डी या खेळाचा भविष्यात ऑलिंपिक, एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश होण्याच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल असेल
2016 - स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचण्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथे यशस्वीरीत्या पार पडल्या.