Rashmi Mane
1949 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या राज्य घटनेस मान्यता.
1998 - पंजाबमधील खन्ना रेल्वे अपघात. २१२ जणांचा मृत्यू
1997 - अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, आणि संरक्षणमंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना देशाचा "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
2000 - रेल्वे मंत्रालयातर्फे न्यू जलपैगुडी-दार्जिलिंगदरम्यान धावणारी चिमुकली रेल्वे जगाला अर्पण.
2005 - उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे बलूनमधून ६९ हजार ८५५ फूट उंचीवर उड्डाण. नवा विश्वविक्रम स्थापित
2008 - मुंबईवर अतिरेकी हल्ला. पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तय्यबाचे दहा अतिरेकी मुंबईत घुसले. सीएसएमटी, ताज, नरीमन हाॅटेल, छबाड हाऊस इथे अतिरेक्यांकडून नरसंहार. दोन ठिकाणी टॅक्सीत बाँबस्फोट. अखेर मुंबई पोलिसांनी अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडले. त्याला नंतर फासावर लटकवण्यात आले.
2008 - महाराष्ट्रात सर्वप्रथम संविधान दिन साजरा.