सरकारनामा ब्यूरो
सचिन अतुलकर हे वयाच्या 22व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते मध्य प्रदेशचे 'डीआयजी' म्हणून कार्यरत आहेत.
सुबोध कुमार जैस्वाल हे महाराष्ट्र पोलिस दलातील १९८५ च्या 'बॅच'चे अधिकारी आहेत.
शिवदीप लांडे हे २००६ च्या 'बॅच'चे 'आयपीएस' अधिकारी असून, ते सध्या कोशी रेंज, बिहार येथे उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पुथियोट्टिल विजयन हे भारतीय पोलिस दलाचे 1999 च्या 'बॅच'चे अधिकारी आहेत. तसेच ते 'स्टुडंट पोलिस कॅडेट' प्रकल्पाचे संस्थापक आहेत.
सदानंद दाते हे भारतीय पोलिस दलाचे अधिकारी आहेत. तसेच त्यांनी भारतीय पोलिस सेवेतील अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पदांवर काम केले आहे.
अमित लोढा यांनी 1998 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले.
अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, १९६८ च्या बॅचचे 'आयपीएस' अधिकारी आहेत.
अरुप पटनायक हे पोलिस सेवेतील निवृत्त अधिकारी असून, मुंबईचे 36 वे पोलिस आयुक्त होते.
हसन सफीन यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ५७० वा क्रमांक मिळवत पहिल्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
विश्वास नांगरे पाटील हे १९९७ च्या बॅचचे पोलिस अधिकारी असून, वयाच्या 23 व्या वर्षी पोलिस दलात 'आयपीएस' अधिकारी म्हणून रुजू झाले.