Rashmi Mane
आयएएस अधिकाऱ्याचे प्राथमिक कर्तव्य सरकारी धोरणे तयार करून, त्यावरील अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
सरकारी आणि सामाजिक काम सुरळीत चालू राहण्यासाठी त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची असते.
विकासात्मक प्रकल्पांसाठी निधीवाटप आणि जनतेच्या फायद्यासाठी संसाधनांचा योग्य वापर करणे.
संकटकाळात मदतकार्य करणे आणि व्यवस्थेत समन्वयक म्हणून अधिकाऱ्याची जबाबदारी असते.
देशाच्या लोकशाही तत्त्वांचे रक्षण करून पारदर्शकपणे निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची असते.
सरकार आणि नागरिक यांच्यात समन्वय साधणे तसेच समस्यांचे निराकरण करून तक्रारींवर योग्य ती कारवाई घेणे.
नागरी आणि प्रशासकीय वाद-विवादांमध्ये न्यायदंडाधिकारी म्हणून न्याय देण्याचे काम अधिकाऱ्याचे असते.
विविध मंचांवर तसेच आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात सरकारचे प्रतिनिधित्व करून भूमिका मांडण्याची जबाबदारी असते.
समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतर सहकारी आणि विभागांसोबत समन्वयक साधण्याची जबाबदारी असते.
कायदा आणि सुव्यवस्था निश्चित करून त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची असते.