Rashmi Mane
आपण नेहमी ऐकतो जगातील ताकदवान नेत्यांविषयी – पण त्यांना किती पगार मिळतो? आश्चर्य वाटेल, काही नेता मोठ्या कंपन्यांच्या CEO पेक्षाही अधिक कमावतो!
या यादीत अमेरिका, चीन, फ्रान्स यासारख्या देशांतील नेत्यांचा समावेश आहे. पण
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे नेते आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न $१.६१ दशलक्ष (अंदाजे ₹१३.४ कोटी) आहे.
हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली का-च्यू दुसऱ्या स्थानावर आहेत ज्यांचे वार्षिक वेतन $६९५,००० (₹५.७८ कोटी) आहे.
स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा व्हायोला अमहार्ड यांना दरवर्षी $५३०,००० (₹४.४१ कोटी) कमाई होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे चौथ्या स्थानावर आहेत आणि त्यांचे वार्षिक वेतन $४००,००० (₹३.३३ कोटी) आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे वार्षिक उत्पन्न $३९०,००० (₹३.२५ कोटी) आहे.
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ हे सहाव्या स्थानावर आहेत आणि त्यांचे वार्षिक वेतन $३६७,००० (₹३.०६ कोटी) आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे वार्षिक वेतन $२५६,००० (₹२.१३ कोटी) आहे.