सरकारनामा ब्यूरो
प्रसिद्ध क्रिकेटर केदार जाधव यांनी मंगळवारी (ता.8) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .
गेल्या वर्षी केदार जाधव यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर केदार आता राजकीय मैदान गाजवण्यासाठी तयार झाले आहेत, तर याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांची एकूण संपत्ती किती आहे?
केदार यांनी IPL चे अनेक सामने खेळले असून यात CSK, RCB, SRH अशा प्रमुख टीममध्ये ते होते. सर्वात जास्त CSK कडून तीन सामने खेळण्यासाठी त्यांची 7.8 कोटी रुपयांची डील झाली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे एकूण 50 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. ही संपत्ती फक्त क्रिकेटमधून मिळवलेली नसून, व्यवसाय गुंतवणूक, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्व केलेल्या करारातून मिळालेली आहे.
त्यांचे राहणीमान खूप राॅयल आहे. ते नेहमी त्यांच्या BMW X4 मध्ये फिरताना दिसतात. ज्या कारची किंमत भारतात 84 लाख रुपये इतकी आहे.
त्यांच्याकडे अन्य आलिशान कार आणि मालमत्ताही आहे.