Deepak Kulkarni
प्रियांका शुकला सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत आणि नेहमी आपले फोटो शेअर करत असतात.
प्रियंका शुक्ला यांना x प्लॅटफॉर्मवर अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून इंस्टाग्रामवर 10 हजारांहून अधिक लोकं त्यांना फॉलो करतात.
प्रियंका या आयएएस ऑफिसर असून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
त्यांच्या कुटुंबियांची पहिल्यापासूनच प्रियंका यांनी IAS अधिकारी व्हावं अशी इच्छा होती. मात्र, लहानपणापासूनच त्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्नं पाहिलं होतं.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरू होती.त्यामध्ये त्या आनंदी होत्या. पण, त्यांच्यासोबत आयुष्यातला सर्वात टफ क्षण आला आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेनं त्यांचं आयुष्यच बदललं.
प्रियंका शुक्ला एकदा स्लम एरियामध्ये गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी एक महिला अतिशय खराब पाणी पीत होती आणि आपल्या मुलाला देखील देत होती. त्यावेळेस शुक्ला यांनी तिला असं न करण्यास सांगितलं.
मात्र, त्यावर त्या महिलेने तू कलेक्टर आहेस का? अशा शब्दांत प्रियंका यांना जाब विचारला. पण तोच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याक्षणी त्यांनी UPSC परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर होण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि 2009 मध्ये UPSC परीक्षा पास होत IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
प्रियांका शुक्ला या उत्तम नृत्यांगना असून उत्तम चित्रही काढतात. त्यांना कविता करण्याचा छंदही त्या आवर्जून जोपासतात.