Devendra Fadnvis : जपानचे पारंपारिक जेवण अन् 'डॉक्टरेट' ; पाहा फडणवीसांच्या जपान दौऱ्याचे काही खास क्षण !

Rashmi Mane

जपान दौरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस जपान दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट फडणवीस जपानमध्ये असणार आहेत.

Devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

'डॉक्टरेट'

देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी मानद 'डॉक्टरेट' बहाल करण्यात आली.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

पहिलेच भारतीय

विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

अभिवादन

जपानमध्ये कोयासन येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

स्वागत

कोयासनला मधील रेन्गेजो-इन मंदिरात वाकायामा प्रांताचे माननीय गव्हर्नर शुहेई किशिमोटो सॅन यांनी पारंपारिक पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि शिष्ट मंडळाचे स्वागत केले.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

शिष्ट मंडळासोबत

विद्यापीठाचे अध्यक्ष र्युशो सोएदा सान, योशिया हिरानो सान, सरकारी अधिकारी आणि मान्यवरांसह वाकायामा येथे.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

वाकायामा येथे जपानी पारंपारिक जेवण

कोयासन येथील 'रेन्गेजो-इन' मंदिरात वाकायामाचे राज्यपाल शुहेई किशिमोटो सान यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

पारंपारिक भोजनाचा

या स्नेहभोजनात जपानमधील पारंपारिक भोजनाचा आनंद फडणवीसांनी घेतला.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

'मेट्रो ऑफिस'ला भेट

या दौऱ्या दरम्यान, त्यांनी तेथील मेट्रोच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी "अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण, एकात्मिक बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली." अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी व्यक्त केली.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

जेआर ईस्टचे अध्यक्ष

टोकियो येथील ईस्ट जपान रेल्वे (जेआर ईस्ट) मुख्यालयात जेआर ईस्टचे अध्यक्ष 'युजी फुकासावा' यांची भेट घेतली.

devendra Fadnvis Japan Tour | Sarkarnama

Next : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ५८ अंगणवाडी सेविकांना नियुक्तीपत्र प्रदान

येथे क्लिक करा