Pratima Bhoumik : त्रिपुरात पहिल्यांदांच होणार महिला मुख्यमंत्री, वाचा कोण आहेत प्रतिमा भौमिक?

अनुराधा धावडे

प्रतिमा भौमिक यांना विधानसभा निवडणुकीत 42.25 टक्के मते मिळाली. प्रतिमा यांना 'त्रिपुराची दीदी' आणि 'प्रतिमा दी' म्हणूनही ओळखले जाते.

Pratima Bhoumik | Sarkarnama

भौमिक यांनी धानपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी माकपच्या कौशिक चंदा यांचा 3500 मतांनी पराभव केला.

Pratima Bhoumik | Sarkarnama

भौमिक भाजपच्या तिकिटावर 2019 मध्ये संसदेत निवडून आल्यानंतर दोन वर्षांनी जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

Pratima Bhoumik | Sarkarnama

प्रतिमा भौमिक या विज्ञान विषयात पदवीधर आहेत. 1991 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Pratima Bhoumik | Sarkarnama

 भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वर्षानंतर भौमिक भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य झाल्या. त्यांना धनपूर मंडळाचे प्रमुखही करण्यात आले.

Pratima Bhoumik | Sarkarnama

भौमिक यांनी पक्षाच्या युवक आणि महिला शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. 2016 मध्ये त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले.

Pratima Bhoumik | Sarkarnama

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भौमिक यांनी तत्कालीन खासदार शंकर प्रसाद दत्ता यांचा 305,689 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Pratima Bhoumik | Sarkarnama

सुरुवातीच्या काळात त्या ब्लॉक, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खो-खो आणि कबड्डी खेळायच्या. सोनमुरा येथील बारनारायण या मूळ गावीही त्यांच्या शेती हा पारंपरिक व्यावसाय आहे.

Pratima Bhoumik | Sarkarnama
|