Rashmi Mane
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड या नॅशनल इंटेलिजन्स (DNI) चे संचालक म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा केली आहे.
गबार्ड चार वेळा खासदार राहिल्या आहेत. 2020 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्या उमेदवार होत्या.
तुलसी या अमेरिकेतील पहिल्या हिंदू महिला खासदार आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा त्यांनी अनेकदा निषेध केला आहे.
तुलसी यांचा जन्म अमेरिकेत झाला. मात्र, त्यांच्या आईने त्यांच्या मुलांना हिंदू संस्कृतीनुसार वाढवले.
बांगलादेशात वारंवार होणाऱ्या अत्याचारानंतर 2021 मध्ये तुलसी गबार्ड यांनी हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये ठराव मांडला होता.
गबार्डची राजकीय कारकीर्द वयाच्या 21 व्या वर्षी हवाई राज्य प्रतिनिधीगृहात निवडून आल्यापासून सुरू झाली. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती आर्मी नॅशनल गार्डमध्ये रुजू झाली.
तुलसी गबार्ड यांनी 2013 ते 2021 पर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या म्हणून काम केले. 2020 मध्ये, त्यांनी डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाच्या नामांकनासाठी आपली उमेदवारी सादर केली. मात्र, बायडेन यांच्या विजयानंतर त्यांना पाठिंबा दिला.
2022 मध्ये त्यांनी स्वतंत्र निवडणूकही लढवली होती. ट्रम्प यांच्यानंतर संभाव्य उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणूनही तिच्याकडे पाहिले जात होते.