Mayur Ratnaparkhe
भाजप श्रेष्ठींकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित करून दिल्लीहून परतलेल्या उदयनराजेंचं सातारामध्ये जंगी स्वागत झालं.
यावेळी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरच मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक स्वागतासाठी जमले होते.
फुलांनी सजवलेल्या वाहनातून उदयनराजेंची मिरवणूक निघाली, यावेळी मोठ्याप्रमाणावर त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली गेली.
क्रेनच्या सहाय्याने भव्य हारही उदयनराजेंना घालण्यात आला.
यावेळी रस्त्यावर प्रचंड मोठी गर्दी झाली होती आणि वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
मोठ्यासंख्येने आलेले समर्थक उदयनराजेंची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते.
उदयनराजेंच्या स्वागतासाठी एका पेक्षा एक असे भव्य हार तयार करण्यात आले होते, शिवाय अनेक क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी सुरू होती.
सातारा शहरातही जागोजागी उदयनराजेंचे जल्लोषात स्वागत झाले.
समर्थकांकडून आणि सातारकरांकडून झालेले भव्य स्वागत पाहून उदयनराजेही आनंदी दिसत होते.