Rashmi Mane
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६३वा वाढदिवस आहे.
मितभाषी, कलाप्रेमी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.
उद्धव ठाकरे यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर येथे झाले. जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं.
उद्धव ठाकरे हे देशातील नामवंत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पैकी एक आहेत. त्यांना लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे ते जवळपास 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिल्याचे सांगितले जाते.
राज्याच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रांचे संकलन ‘महाराष्ट्र देशा’ आणि 'पहावा विठ्ठल' या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर ठेवले.
उद्धव ठाकरे एकदा एका कार्यक्रमात म्हणाले होते, 'फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सिजनसारखी आहे. कोणी काहीही म्हटलं तरी मी फोटोग्राफी सोडू शकत नाही.'
उद्धव ठाकरे 'एरिअल फोटोग्राफी'साठी ओळखले जातात.
उद्धव ठाकरे 2002 पासून सक्रिय राजकारणात आहेत. मात्र, राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे मराठी वृत्त दैनिक हिंदूमध्ये पत्रकार म्हणून काम करायचे.