Deepak Kulkarni
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.
त्यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे.
शरद पवारांसह आता उद्धव ठाकरेही मैदानात उतरले असून त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या स्वागताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
ठाकरेंचं विदर्भ दौऱ्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
उध्दव ठाकरे यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले.
आज माझ्याकडे पक्ष नाही. पण तुमचे प्रेम आहे आणि हे तुमचे प्रेम कायम असंच राहू द्या असंही ते यावेळी म्हणाले.
२०१९ साली अमित शाहांबरोबर झालेल्या चर्चेबाबत उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे.
यावेळी दौऱ्यात त्यांनी पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर आता महंतांची भेट घेत व त्यांचे आशीर्वाद घेतला.
सुरक्षेच्या कारणाने पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये पोहरादेवी येथे बामनलाल महाराज मंदिर येथे त्यांच्या हस्ते होम पूजेमध्ये नारळ अर्पण करून आहुती त्यांनी यावेळी दिली.