Rashmi Mane
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
1 फेब्रुवारी 2024ला संसदेत अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्पादरम्यान देशासाठी गेल्या एक वर्षाचा आर्थिक लेखाजोखा कसा होता आणि येत्या आर्थिक वर्षात कोणत्या कामांसाठी पैसा लागेल याची माहिती देणार आहेत.
अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारीला देशाचा आर्थिक सर्वेक्षण सादर केला जाणार आहे
अर्थ मंत्रालयाशी संलग्न मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांच्या टीमने तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण 31 जानेवारीला सादर केले जाईल.
मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.